Choose Language - English

पाहायला विसरू नका, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे
IBN 18 LOKMAT- Sat: 4:30PM | Z24 Tas- Tue: 2:30PM


 • शिलेदार नोंदणीसाठी येथे क्लिक करा

  'सुवर्ण कोकण' च्या प्राथमिक सभासद अथवा अश्वमेध मोहिमे बद्दल जाणून घेण्यासाठी तसेच त्याचे फायदे ज्ञात करून शिलेदार बनण्यासाठी सदरील माहिती वाचा व रजिस्टर करा.


  कार्यशाळा नोंदणीसाठी येथे क्लिक करा

  जिद्दी, होतकरू तरूण मंडळींसाठी दरमहा प्रचंड आर्थिक समृद्धी मिळणाऱ्या विषयांवर म्हणजेच भाजीपाला लागवड, फळप्रक्रिया, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, देशी गायीचे अर्थशास्त्र, परसबागेतील श्रीमंती इ. विषयांवर विशेष कार्यशाळेचे आयोजन केले जाते.

 • डिव्हीडी खरेदीसाठी येथे क्लिक करा

  कार्यशाळा आणि अभ्यासदौरा यातून मिळणारी उद्योगाबद्दलची माहिती कायमची लक्षात राहू शकत नाही. प्रत्येक विषयातील श्रीमंतीचे गांभीर्य व्यस्थित समजावे या करिताच सुवर्णकोकणने कार्यशाळा आणि अभ्यासदौरे यांच्य एकत्रित DVD सीडी संच आपल्या शिलेदारांसाठी उपलब्ध केला आहे.


  अधिक माहिती साठी संपर्क करा

  सुवर्ण कोकण बद्दल आपणास एखादी माहिती हवी असेल ती शिदेलर नोंदणीची असो वा कार्यशाळा नोंदणीची, डिव्हीडी खरेदीची असो वा अन्य इतर; मनमोकळे पणाने संपर्क साधा.

सुवर्ण कोकण बद्दल

सुवर्ण कोकण शेती शेतीपूरक व्यवसायातील प्रचंड श्रीमंती उलगडून उद्योजगतेच्या मार्गे तमाम मराठी जनांस श्रीमंतीकडे धावण्यास प्रवृत्त करणारी मुलखावेगळी उद्योजकीय चळवळ. चैत्र शुक्ल प्रतिपदा गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रासतील अग्रगणी झी - २४ तास वाहिनीवरून दररोज सकाळी ६.३० वाजता सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे ह्या शेतीकडून समृद्धीकडे घेऊन जाणाऱ्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या रूपाने मोठ्या दिमाखात सुरवात झाली. अल्पावधीतच उद्योजगतेचे ज्ञानामृत देणारा हा कार्यक्रम "सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे" म्हणून मोठ्या दिमाखात घराघरात पोहचला आणि महाराष्ट्रातील अस्पुट, निद्रिस्त मनांना श्रीमंत उद्योजकीय जगाकडे यायला दाद घालू लागला.

गरिबी, दुष्काळ, बेकारी या आस्मानी संकटाखाली दबून गेलेली मराठी मानसिकता उदरनिर्वाहासाठी शेती सोडून शहराकडे वळली, मग मातीतील शाश्वत संपत्ती धूळ खात पडली. 'तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलाशी' या युक्तीप्रमाणे भरकटत चाललेल्या मराठी माणसाला उद्योजक निर्माण कार्यशाळा, विविध अभ्यास दौरे, अश्वमेधच्या कार्यशाळा, प्रचंड मागणी असलेल्या शेती - शेती पूरक व्यवसायातील श्रीमंतीच्या अगदी जवळ घेऊन जाणाऱ्या DVD इ. माध्यमातून मातीतील श्रीमंती पाहण्याचा डोळस पणा देऊन यशस्वी उद्योजक बनण्याच्या प्रक्रियेत अत्यावश्यक सर्व मदत करून यशशिखरावर घेऊन जाणारी ही क्रांतिकारी चळवळ निष्ठेने आणि प्रामाणिक ध्येयाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचून महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सुवर्ण करण्याचे स्वप्न उराशी घेऊन पसरते आहे.

चाकरीची सुलतानी बंधने झुगारून स्वतंत्र दौलतीचा उद्योग धाडसाने अंगावर घेऊन घरच्या लक्ष्मीला, आई - वडिलांना, मुला बाळांना सुखाचे, समृद्धीचे, ऐश्वर्यसंपन्न वैभवाचे दिवस दाखवूया. फक्त कल्पनेची नजर बाळगा, श्रमांना कंटाळू नका, यश फारसे लांब नाही चला सुवर्णकोकणचे शिलेदार बनूया, मातृभूमीचे पांग फेडूया.