Choose Langugage - English

पाहायला विसरू नका, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे
IBN 18 LOKMAT- Sat: 4:30PM | Z24 Tas- Tue: 2:30PM

मिडिया दालन

दृष्ट लागण्या जोगे सारे.....

सुवर्णकोकणच्या ५१ व्या फुडमाॅलचा लोकार्पण सोहळा अतिशय दिमाखात अंधेरीच्या कोलडोंगरी विभागात प्रचंड जल्लोषात संपन्न झाला. मराठमोळ्या उद्योजकतेस प्रोत्साहन देण्यासाठी हजारो मुंबईकर संध्याकाळी ४ वाजल्यापासुन ठाण मांडुन उपस्थित होते, ढोल ताशांच्या निनादात १० फुट उंच मालवणचा जगप्रसिद्ध कोंबड्याचा नृत्याविष्कार उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा होता. आजवर कधिही न पाहिलेले असे स्वच्छ, सुंदर आणि अत्याधुनिक मशीनरीनी सज्ज कोंबड्यांचे दुकान आणि सोबत दिमतीला जात्यावर दळलेली विविध पीठ, उखळित कुटलेले सर्व प्रकारचे मसाले आणि अस्सल चवीचे व पारंपारीक पद्धतीने बनवलेली दर्जेदार आरोग्यवर्धक उत्पादने खरेदी करण्यासाठी लोकांची अक्षरशा झुंबड उडाली होती खरेदीचा हा अभुतपुर्व आणि अविस्मरणीय सोहळा रात्रो १ वाजेपर्यत मोठ्या उत्साहात सुरु होता, शेवटी लोकांची मनधरणी करुन दुकान बंद करावे लागले आणि दुस-या दिवशी शनिवारी व रविवारी अंधेरीवासीयांनी सकाळी ६ वाजल्यापासुन लाईन लावुन जवळपास हजारो कोंबड्यांची खरेदी केली तसेच लाखो रुपयांच्या अन्य दर्जेदार उत्पादनांची खरेदी करुन मराठमोळ्या उद्योजकतेस भरभरुन पाठिंबा व आशिर्वाद दिला. आश्चर्याची बाब म्हणजे सुवर्णकोकणचा फुडमाॅल अंधेरीत सुरु झाल्यामुळे असंख्य लोकांनी प्रत्यक्ष भेटुन फुडमाॅलधारक श्री. दिपक मांजरेकर व त्यांच्या कुटुंबियांचे चक्क आभार मानले. मित्रांनो कैक वर्षांनी का होइना परंतु मराठमोळ्या शिलेदारांचा चिकनविक्रीच्या व्यवसायातील लक्षणीय शिरकाव व सदर व्यवसायात त्यांनी केलेला आमुलाग्र बदल एकदातरी अनुभवा मराठी उद्योजकतेचा अभिमान वाटेल असा स्वप्नवत बदल आपणा सर्वाच्या नजरेत नक्कीच येईल.तुम्हा सर्वांचे प्रोत्साहन व पाठबळ आम्हास लाखमोलाचे.धन्यवाद !🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

113a3e45-61bc-467a-9640-2eac96b167fc.jpg36e6e152-a0b7-4c40-b70e-cc1776cd2c68.jpg8021b648-8b89-46a4-a05b-77b959a5092d.jpg82699d95-e63c-406e-9967-24bd0669855a.jpg94cb3a27-a90f-4a0f-ae79-35a23629795d.jpg

सह्याद्रीच्या शिखरावर सुवर्णकोकणचा गरुडध्वज....

सुवर्णकोकण फुडमाॅलची अफाट लोकप्रियता आणि त्यातील अस्सल व दर्जेदार उत्पादनांचा विक्रमी खप तसेच प्रचंड नफ्याच्या चिकनविक्रीच्या व्यवसायातील मराठी उद्योजकांचा विशेषकरुन महीलांचा यशस्वी शिरकाव आणि त्यांनी अल्पावधितच मिळवलेल्या घवघवीत यशाचे तोंडभरुन कोंतुक महाराष्टांचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणविस यांनी काल सह्याद्री अतिथीगृहावर बोलवुन केले मराठमोळ्या उद्योजकतेची ही मुलखावेगळी चळवळ जोमाने वाढविण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे वचन देखिल त्यांनी सदरप्रसंगी दिले. आमचे परममित्र आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष माननीय श्री. विनायक मेटे साहेब यांचे विशेष सहकार्य सदर बैठकीस लाभले सर्वांचे मनपुर्वक आभार व धन्यवाद !

1.jpg2.jpg3.jpgPost.jpg

नवे शिलांगण ! नवे संक्रमण !

परकीयांच्या मक्तेदारीस आव्हान देत प्रचंड नफा देणा-या चिकन विक्रीच्या व्यवसायातुन उद्योजकीय एल्गार करत अवघ्या ४ महीन्यात जवळपास ४० फुडमाॅलच्या माध्यमातुन मराठी उद्योजकतेची गरुडपताका दिमाखाने उंचावत सर्वाना अचंबित करणारे सुवर्णकोकण फुडमाॅलचे सर्व उद्योजक विजयादशमीच्या पर्वात नव्या शिलांगणास सज्ज आहेत. पारंपारिक पद्धतीने तयार केलेले अस्सल दर्जेदार आणि अप्रतिम चवीचे विवीध आरोग्यवर्धक उत्पादने आता अतिशय माफफ दरात सुवर्णकोकणच्या सर्व फुडमाॅल मध्ये लवकरच उपलब्ध होतील.तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद लाखमोलाचे. धन्यवाद !🙏🏻🙏🏻🙏🏻

1.jpg10.jpg11.jpg12.jpg13.jpg14.jpg15.jpg16.jpg17.jpg18.jpg19.jpg2.jpg20.jpg21.jpg22.jpg23.jpg24.jpg25.jpg26.jpg27.jpg28.jpg29.jpg3.jpg30.jpg31.jpg32.jpg4.jpg5.jpg6.jpg7.jpg8.jpg9.jpg

मराठमोळ्या उद्योजकतेचे अभुतपुर्व सीमोल्लंघन !

विजयादशमीच्या मंगलदिनी एकाच दिवशी सुवर्णकोकणच्या ३ फुडमाॅलचे भव्य लोकार्पण. मराठमोळ्या श्रीमंतीच्या अभुतपुर्व उत्सवात आवर्जुन उपस्थित राहुन नव उद्योजकांना प्रोत्साहीत करा आणि उद्योजकतेच्या अश्वमेधात सामील व्हा. आपल्या शुभेच्छा व आशिर्वाद आम्हास लाखमोलाचे. धन्यवाद !

37.jpg38.jpg39.jpg

सिंधुदुर्ग कृषी महोत्सव

कोकणच्या लाल मातीतुन आधुनिक शेतीतील प्रचंड श्रीमंती आत्मसात करण्यासाठी सिंधुदुर्ग कृषी महोत्सवासाठी जगभरातुन अभुतपुर्व प्रतिसाद. ४२ हजार ७०० लोकांनी रितसर नोंदणी करुन आपला सहभाग निश्चित केला. सर्वांचे मनपुर्वक आभार व धन्यवाद ! मातीतली शाश्वत श्रीमंती व शेती - शेतीपुरक व्यवसायातला प्रचंड हमखास नफा प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी व विशेष प्रशिक्षणांतर्गत तुटपुंज्या भांडवलात अल्पावधितच श्रीमंती आत्मासात करण्यासाठी आजच आपला सहभाग नोंदवा. सुवर्णकोकण - 9664330123 8779451600.8879993821. विशेष प्रशिक्षणाकरीता नोंदणी बंधनकारक फक्त निवडक जागा शिल्लक. www.suvarnakokan.in

Abhyasdoura 1.jpg

कोकणच्या लाल मातीतला श्रीमंतीचा भव्य महोत्सव !

अल्पशा श्रमात व तुटपुंज्या भांडवलात कुठलाही पुर्वानुभव नसताना देखिल वार्षिक १० ते १५ लाखांचा हमखास नफा देणा-या विवीध शेती-शेतीपुरक व्यवसायांचे प्रात्यक्षिकांसहीत शास्त्रोक्त प्रशिक्षण व विक्रीपर्यतचे सखोल मार्गदर्शन आणि शेतक-यांचे उत्पन्न १००% दुप्पट करणारे कृषी श्रीमंतीचे अभुतपुर्व प्रदर्शन जगभरातल्या लाखो श्रीमंत उद्योजकांसोबत ! कोकण कृषी विद्यापीठाच्या आंतरराष्टीय कृषी महोत्सवात सामिल होऊन मातीतली भव्य श्रीमंती अल्पावधीतच आत्मसात करण्यासाठी आणि उद्योजक बनुन स्वाभिमानाने जगण्यासाठी सुवर्णकोकणच्या मोफत कार्यशाळेस आवर्जुन उपस्थित रहा आणि हमखास श्रीमंत बना. सविस्तर माहितीसाठी सुवर्णकोकणच्या अधिकृत फेसबुक पेज किंवा युट्युब चॅनलला त्वरित Like करा.धन्यवाद !

सुवर्णकोकण फुड माॅल - राजमार्ग श्रीमंतीचा

मुहुर्ताची नव्हे तर निर्धाराची गरज आहे ! श्रीमंत उद्योजक होण्यासाठी लागणारी ईर्षा,मनाचा झंझावात किंवा जिद्द बाजारात विकत मिळत नाही तर ती अंतरात्म्यातच असायला हवी आणि तीच अंतरात्म्यात रुजवुन हमखास श्रीमंती आत्मसात करण्यासाठी, गरीबी आणि लाचारीच्या शृंखला उध्वस्त करुन मराठी उद्योजकतेचा गरुडधव्ज डोंलाने फडकवण्यासाठी आवर्जुन सामील व्हा सुवर्णकोकणच्या उद्योजक चळवळीत..

FM 1.jpgFM 2.jpgFM 3.jpgFM 4.jpgFM 5.jpg

गुढी श्रीमंतीची ! मराठी उद्योजकतेची !

सुवर्णकोकणच्या माध्यमातुन १०० मराठी उद्योजक एकाच वेळी मुंबई व उपनगरात सुवर्णकोकण फुड माॅलच्या माध्यमातुन उद्योजकतेची गुढी उंचावण्यास सज्ज झाले आहेत त्यांचे अभिनंदन करुन त्यांना मनपुर्वक शुभेच्छा देण्यासाठी तसेच मुंबईची नवी ओळख होऊ पाहणा-या सुवर्णकोकण फुड माॅलची नेमकी संकल्पना काय ? सामन्य मुंबईकरांना आरोग्याच्या दुष्टीकोनातुन होणारे प्रचंड फायदे ! महाराष्टांतल्या शेतक-यांचा शेतमालाला मिळणारी खात्रीशीर बाजारपेठ, महीला बचतगटांना मिळणा-या हमखास स्वयंरोजगारांच्या अभुतपर्व संधी आणि सुवर्णकोकणच्या शिलेदारांना ब्रॅड अॅम्बेसिडरच्या माध्यमातुन प्राप्त हमखास भरघोस नफा ई.सविस्तर माहीती जाणुन घेण्यासाठी आवर्जुन सामील व्हा सुवर्णकोकणच्या शिलेदार सभेस आणि मराठमोळ्या उद्योजकीय चळवळीत सामील व्हा ! श्रीमंत उद्योजक बना ! स्वाभिमानाने जगा !

.....तर कित्याक करुची चाकरी ?

कोकणवासीयांनो जागे व्हा फक्त नोकरी - चाकरी करण्यात धन्यता न मानता शेती- शेतीपुरक व्यवसायांतील प्रचंड श्रीमंती समजुन घ्या व शास्त्रोत प्रशिक्षणाच्या मदतीने आत्मसात करा. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी १४.३४ लाख कोटी. शेती कर्जासाठी ११ लाख कोटी. आॅपरेशन बांबु १२०० कोटी. सिंचनासाठी २६०० कोटी. मत्स्यसंवर्धन व पशुपालनासाठी १०,००० कोटी. जवळपास २६ लाख कोटी एकुण कृषी क्षेत्रासाठी तर ग्रामीण विकासासाठी १४.३४ लाख कोटी रुपयांची प्रचंड तरतुद करण्यात आली आहे, दरवर्षी असेच लाखो कोटी रुपयांची भरघोस तरतुद कृषी क्षेत्रांसाठी करण्यात येते परंतु सदरच्या योजनांचा लाभ घेताना कोकणी माणुस कधीच कुठे दिसत नाही, आंबा काजु आणि भातशेती वर गुजरान होत नाही म्हणुन लोंढेच्या लोंढे शहरांकडे धाव घेतात आणि आयष्यभर तुटपुंज्या पगाराची नोकरी करण्यात धन्यता मानतात. वास्तविक कुक्कुटपालन, शेळीपालनासाठी कमाल २० लाखापर्यतचे कर्ज उपलब्ध असते व त्यात ५०% म्हणजेच रुपये १० लाखाचे अनुदान असते फळलागवडीसाठी १० लाखापर्यतचे कर्ज त्यातही ५०% अनुदान. मत्स्यपालनाच्या विवीध योजना. हक्काचे प्रचंड भांडवल उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असताना देखिल फक्त माहीत नाही ह्या सदराखाली आपण सोयीस्कर दुलर्क्ष करतो. शासकीय यंत्रणेस अथवा लोकप्रतिनिधीस सदरच्या योजना सर्वसामान्य कोकणवासीयांपर्यत पोहचवण्यात मुळात रस नाही असेच वाटते व त्यामुळेच आंबा, काजु आणि भातशेतीच्या पल्याड विवीध शेतीपुरक उद्योग कोकणात अभावानेच आढळतात. कोकणी माणुस जन्मजातच हुशार प्रामाणिक आणि मेहनती, त्यांच्या कष्टांस जर उद्योजकतेचे बाळकडु आणि उद्योग उभारणीस हक्काचा निधी उपलब्ध झाला तर कोकणाच्या उद्योजकतेचा झेंडा संपुर्ण विश्वात डोलाने फडकेल आणि त्यासाठी गरज आहे प्रत्येक कोकणवासियांनी स्वताच पुढाकार घेण्याची, जाणुन घ्या अल्पवधित, तुटपुंज्या भांडवलात हमखास नफा देणारे विवीध कृषीउद्योग आणि सबंधित योजना. श्रमांना कंटाळु नका कल्पनेची नजर बाळगा, शास्त्रोक्त प्रशिक्षण घ्या प्रगत तंत्रज्ञानाची कास धरा अल्पावधित श्रीमंत व्हा आणि स्वाभिमानाने जगा. लागवडीपासुन विक्रिपर्यत सर्वोतोपरी मदत करण्यास सुवर्णकोकणचे शिलेदार सदैव तत्पर आहेत. अधिक माहीतीसाठी सुवर्णकोकणच्या फेसबुक व युट्युब चॅनलला Like करा.धन्यवाद !

अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !

भीमा - कोरेगावच्या दुर्देवी घटनेने महाराष्टांचा पुरोगामी चेहरा क्षणात निखळुन पडला. मुठभर नालायक समाजकंटकांमुळे अख्खां महाराष्ट होरपळुन निघाला, परिस्थिती निवाळण्यापेक्षा टाळकी भडकवुन आगीत तेल टाकण्याची स्पर्धाच जणु पुढा-यांमध्ये लागली होती आणि प्रशासन मात्र उघड्या डोळ्याने सार निमुटपणे पाहत होते. निषेधाचा बंद तर सरला पण मन मात्र कायमची दुभंगली गेली. अरे कुठ फेडाल ही पाप ? आज प्रत्येक जण ऐकमेकांकडे संशयाने आणि सुडाने पाहतोय, महापुरुषांच्या नावाने संपुर्ण समाजच उद्धवस्त करण्यास निघालेत हे पुढारी. सरणावरच्या प्रेताच्या टाळुवरील लोणी काढुन खाण्यासही हे मागे पुढे पाहणार नाहीत, अशाने काय साध्य होणार ? जातीपातीच विष कालवुन मन कुलषित करण्यापेक्षा मातीत मन मिसळवुया बघा हिरे-मोतीच हाती लागतील दुसर खतच नको, उद्योजकतेच्या मार्गे श्रीमंत होऊया व स्वाभिमानाने जगुया मग पहा कुटुंबालाच नव्हे तर अवघ्या समाजाला आपला गर्वच नव्हे तर अभिमान सुद्धा वाटेल आणि हीच काळाची देखिल गरज आहे. धन्यवाद !

श्रीदेव परशुरामाच्या पावनभुमीत चिपळुणात कृषीरत्नांचा सन्मान आणि मातीतल्या श्रीमंतीचा भव्य जागर !

आंबा, काजु आणि भातशेतीच्या पारंपारिक चोकटीत न अडकता सुवर्णकोकणच्या माध्यमातुन आधुनिक हळद व मशरुम लागवड, मत्सशेती, बंदिस्त शेळीपालन, आणि व्यावसायिक कुक्कुटपालनातुन प्रचंड हमखास नफा मिळवुन शाश्वत शेतीचा नवा पायंडा निर्माण करणा-या आणि शेतीतुन लाखो रुपयांच्या मिळकतीने चाकरमन्यांना देखिल अचंबित करणा-या रत्नागिरीच्या कृषी उद्योजकांचा भव्य सन्मान सोहळ्यास आवर्जुन उपस्थित रहा आणि जाणुन घ्या लाल मातीतल्या शाश्वत श्रीमंतीची रहस्य ? शहरात राहुन देखिल नफ्याची शेती करता येते आणि गावात राहुन देखिल श्रीमंत होता येत ह्यचा साक्षात प्रत्यय आपणास येईल, श्रीमंत होण्यासाठी वय, शिक्षण, अनुभव, आणि मोठ्या भांडवलाची गरज नाही मनात आणल तर फक्त शास्त्रोक्त प्रशिक्षणाच्या आधारे, तुटपुंज्या भांडवलात देखिल अल्पावधितच श्रीमंत होता येत गरज आहे ती फक्त मनाचा निग्रह करण्याची आणि एकदा का निर्धार केलात की स्वताला पुर्णपणे झोकुन देण्याची बाकी लागवडीपासुन ते थेट विक्रीपर्यत सर्वोतोपरी मदत आणि मार्गदर्शन करण्यास सुवर्णकोकणचे हजारो शिलेदार सज्ज आहेतच. सुवर्णकोकणच्या माध्यमातुन महाराष्टांत आजवर लाखो लोकांनी आधुनिक शेतीचे धडे गिरवुन लाखोंची श्रीमंती सहजपणे आत्मसात केली आहे आपणही उत्सफुर्तपणे सामील व्हा आणि ईतरांनाही ही माहिती कळवुन मातीतल्या श्रीमंतीकडे धावण्यास प्रवृत्त करा.धन्यवाद !

माहुरलक्ष्मी दार उघड बया !

सुवर्णकोकणचे बिनीचे शिलेदार आणि निवृत्त पोलीस अधिकारी श्री यादव लिंबाजी जाधव यांच्या पुढाकाराने नांदेड जिल्ह्यांतील आदिवासी बहुल किनवट तालुक्यात रेणुका मातेच्या प्रांगणात शेती - शेतीपुरक व्यवसायातील श्रीमंतीचा जागर मांडण्यात आला आहे, अतिशय दुर्गम आणि विकासपर्वा पासुन कोसो दुर असलेल्या किनवट भागातिल असंख्य लोकांचे घरटी उत्पन्न ३-४ हजारांच्या घरात देखिल नसेल, प्रचंड बेकारी आणि दारिद्रयांच्या शृंखलांत वर्षोनुवर्षे अडकलेल्या आपल्या समाजबांधवाना बाहेर काढण्यासाठी आधुनिक शेतीचे महत्तव त्यांच्या पर्यत पोहचवण्यासाठी सुवर्णकोकणचे शिलेदार श्री यादव लिंबाजी यांनी मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे. गेली ३ वर्ष पोलीस दलातील व्यस्त नोकरी सांभाळुन देखिल सुवर्णकोकणच्या माध्यमातुन विशेष प्रशिक्षण घेऊन प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने आधुनिक शेतीचे धडे गिरवत किनवट गावी शेती - शेतीपुरक व्यवसाय करत मातीतील शाश्वत श्रीमंती आत्मसात करुन एक नवा आदर्श समाजापुढे मांडला आहे. शेकडो लोक दररोज त्यांची यशस्वी शेती पाहण्यासाठी त्यांचा शेतावर येत असतात, जर मी पोलीस दलातील नोकरी सांभाळुन सर्व अडचणींवर मात करत शेतीमधुन हमखास नफा मिळवु शकतो तर माझे समाज बांधव देखिल आधुनिक पद्धतीने शेती करुन हमखास नफा मिळवु शकतात व त्यासाठीच सुवर्णकोकणची कार्यशाळा आपल्या तालुक्यात आयोजीत करण्याचा त्यांचा हट्ट परकोटीचा होता, कार्यशाळेच्या माध्यमातुन आपल्या गोर-गरीब समाज बांधवाचे जीवनमान उंचावुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची जिद्द, चिकाटी आणि प्रचंड तळमळ खरोखरच थक्क करणारी आहे, शिलेदार लिंबाजी यादवांच्या कर्तुत्तवास मनपुर्वक सलाम !

१७ ऑगस्ट लातूर मोफत उद्योजक निर्माण कार्यशाळा

सुवर्णकोकण - सामर्थ महाराष्टांचे

अनंत आमुची ध्येयासक्ती....

दिनांक- ३० जुलै २०१७.स्थळ - नाशिक. पावसाची संततधार आणि मुख्यमंत्र्यासहीत अनेक मंत्रिगण हाॅलपासुन हाकेचा अंतरावर सरकारी उदघाटनाच्या कार्यक्रमास येणार असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी अशा अनंत अडचणीतुन यशस्वी मार्ग काढत लोकांच्या झुंडीच्या झुंडी सुवर्णकोकणच्या कार्यशाळेत मोठ्या हिकमतीने दाखल होत होत्या, निसर्गाचा लहरीपणा, प्रशासकीय यंत्रणेचा नाकर्तेपणा आणि प्रतिकुल परिस्थितीशी दोन हात करुन देखिल महत कष्टाने पिकविलेल्या शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव या सर्व ओझ्यामुळे मोडून गेलेला कणा, हतबल झालेलं जीण ह्या पारंपरिक लडखडत्या मार्गातून पुन्हा नव्याने उसळी घेत शाश्वत श्रीमंती देणारे काही उद्योग सुवर्णकोकणचा साथीने करावेत आणि आपल्या लेकरांना सुखाचे दोन घास देता यावे ह्या अतीव इर्षेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अकोला, जळगाव, अमरावती,धुळे,पुणे, नगर, यवतमाळ, बीड, ते अगदी थेट दिल्लीतुन देखिल सैन्यातील काही जवान सुद्धा सुवर्णकोकणचा कार्यशाळेस आवृजुन उपस्थित होते. सकाळी १० ची वेळ असताना पहाटे ६ पासूनच लोकांनी गर्दी केली होती. मुंगीलाही शिरायला वाव नव्हता इतके सभागृह गर्दीने फुलुन गेले होते अशा अवघड परिस्थितीत लोक ४-५ तास कसलीही गडबड न करता नव्या संधी, नवे मार्ग उत्स्फुर्ततेने समजावून घेत होते. सवांद साधत होते. समस्या मांडत त्यांची उत्तरे मिळवत होते.कार्यशाळेची सुरवात नाशिकच्या शिलेदार संगीताताई ढेरंगे यांनी प्रस्तावना करत केली.परंतु त्यानंतरचे तब्बल ४ तास सुवर्णकोकणचे अध्यक्ष श्री सतीश परब साहेब निरंतर न थकता कधी उभे राहवून तर कधी लोकांच्या मध्येच जमिनीवर बसून लोकांशी सवांद साधत होते, बाजारात विकलं जाणारे आपल्या शेतात पिकायला हवं.ते कसं, त्यातील नवे तंत्रज्ञान, नव्या कल्पना, नव्या संधी, त्यासाठी लागणारी योग्य ती सर्व मदत लोकांच्या मनात उतरवत त्यांच्यातीलच उदाहरणे समोर ठेवत माहिती देत होते. अगदी प्रामाणिक, निस्वार्थ भावनेने पोटतिडकीने,तळमळीने पारंपरिक फेऱ्यात अडकलेल्या पोशिंद्याला बाहेर पडायचे उद्योजकीय मार्ग सांगत होते, शेळीपालन, कुक्कुटपालन,मत्सव्यवसाय, हळद,मशरुम व चंदन लागवड इ. प्रचंड नफा देणारे व्यवसाय शास्त्रोक्त प्रशिक्षणाच्या आधारे केल्यास हमखास नफा मिळवता येतो हे सहज सोप्या भाषेत समजून घेताना लोकांमधिल निराशेचे ढग विरत जाताना दिसत होते, नव्या उमेदीने उद्योजकीय जग जिंकण्यास सज्ज सर्वांना मनपुर्वक सलाम . शिलेदार - राजन सुर्वे (रत्नागिरी) सुवर्णकोकण - सामर्थ महाराष्टांचे दररोज सकाळी ६.२५ वा. झी-२४ तास वाहीनीवर

1.jpg2.jpg3.jpg4.jpgMumbai 6.jpgnashik.jpg