Choose Langugage - English

पाहायला विसरू नका, सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे
IBN 18 LOKMAT- Sat: 4:30PM | Z24 Tas- Tue: 2:30PM

शिलेदार नोंदणी

शेती-शेतीपूरक व्यवसायातील उद्योजकीय जग जिंकण्यासाठी, श्रीमंत उद्योजक बाण्याचे स्वप्न उराशी बाळगून 'सुवर्ण कोकण' च्या अश्वमेध मोहिमेत सामील झालेल्या जिद्दी, होतकरू शिलेदारांसाठी दरमहा प्रचंड आर्थिक समृद्धी मिळणाऱ्या विषयांवर म्हणजेच भाजीपाला लागवड, फळप्रक्रिया, शेळीपालन, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन, देशी गायीचे अर्थशास्त्र, परसबागेतील श्रीमंती इ. विषयांवर विशेष कार्यशाळेचे आयोजन केले जाते. सादर कार्यशाळेत नामवंत तज्ञ, यशस्वी उद्योजक यांच्या सोबतीने शिलेदारांना शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाते. तसेच अश्वमेधच्या शिलेदारांना अनुभवी मार्गर्दर्शकांच्या आणि यशस्वी शिलेदारांच्या सोबतीने वैयक्तिकरित्या सखोल माहिती पुरुबुन उद्योग धंद्याच्या उभारणीस सर्वोतोपरी मदत केली जाते व वर्षभराच्या कालावधीत शिलेदारांस श्रीमंत उद्योजक बनविण्यास प्रवृत्त केले जाते. अश्वमेधच्या शिलेदारांस वर्षभरातील सर्व कार्यशाळा, अभ्यासदौरे हे संपूर्णतः मोफत असतात. तसेच डी. व्ही. डी. व अन्य शैक्षणिक उत्पादनांवर भरघोस सवलत असते.
शेती-शेतीपूरक व्यवसायातील प्रचंड श्रीमंती आत्मसात करण्यासाठी सुवर्णकोकणचे सभासद होणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी जिद्द, चिकाटी यांच्यासोबत श्रीमंत उद्योजक बनण्याची आंतरिक तळमळ आणि दृढनिश्चय खूप महत्वाचा आहे. दुर्दम्य इचछाशक्ती असेल तर वज्रसंकटांनाही सुरुंग लावता येतो. ईर्षा, मनाचा झंझावात किंवा जिद्द काही बाजारात विकत मिळत नाही ती अंतरात्म्यात असावी लागते, त्यासाठी आपल्या दारिद्र्याबद्दल, गरिबीबद्दल चीड असावी लागते, त्याला मुहूर्ताची नव्हे तर निर्धाराची गरज असते. सुवर्णकोकणच्या शेती-शेतीपूरक व्यवसायाच्या कार्यशाळा, अभ्यासदौरे, डी. व्ही. डी., मासिके इ. माध्यमातुन श्रीमंत उद्योजक बनण्याचा निर्धार पक्का केला जातो. सभासदांना वर्षभरातील सर्व कार्यशाळा, अभ्यासदौरे, डी. व्ही. डी. व अन्य शैक्षणिक उत्पादनांवर भरघोस सवलत असते.
अश्वमेध आणि कार्यशाळा संदर्भातील विषयांच्या अनुषंगाने अभ्यासदौरे आयोजित केले जातात. अश्वमेध कार्यशाळेत शिकलेल्या विषयांचे प्रात्यक्षिक म्हणजेच अभ्यासदौरा. प्रत्येक क्षेत्रात मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय असो, सर्व ठिकाणी त्या त्या विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त करायचे असेल तर त्याचे प्रात्याक्षिक किंवा सराव मिळणे गरजेचे आहे. कार्यशाळेच्या माहितीला प्रात्याक्षिकाची जोड मिळल्याने तो विषय समजायला अधिक सोपा जातो. उद्योजकतेचे धडे गिरवत स्वतः बरोबर इतरांना श्रीमंत बनविण्याचा मूलमंत्र देऊन उद्योजकीय क्रान्तीचा अंगार आपल्या धमन्यात चेतविला जातो.

सुवर्ण कोकण अश्वमेध शिलेदार (वार्षिक)

 • शिलेदार नोंदणी शुल्क २५,०००/- वार्षिक
 • वर्षभरात होणाऱ्या सर्व कार्यशाळा व विशेष प्रशिक्षण मोफत.
 • सर्व विषयांचे होणारे प्रात्यक्षिकासहित होणारे अभ्यासदौरे मोफत
 • डी. व्ही. डी. मोफत
 • शिलेदर सभा.
सुवर्ण कोकण अश्वमेध शिलेदार (आजीवन)

 • शिलेदार नोंदणी शुल्क ५०,००००/- आजीवन
 • भविष्यात होणाऱ्या कार्यशाळा व विशेष प्रशिक्षण मोफत
 • सर्व विषयांचे होणारे प्रात्यक्षिकासहित होणारे अभ्यासदौरे मोफत
 • कृषिविद्यापीठ मार्फत होणारे सर्व व्यावसायिक प्रशिक्षण मोफत
 • डी. व्ही. डी. मोफत
 • विभागीय पदाधिकारी पद
 • झी २४तास वहिनीवर होणाऱ्या सुवर्ण कोकण कार्यक्रमात येण्याची संधी
 • शिलेदार सभा